धक्कादायक ! पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने केली आत्महत्या

0 256

 बारामती-   पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या(Suicide)  केल्याची धक्कादायक घटना बारामती (Baramati) जिल्हयातील कुतवळवाडी (Kutwalwadi)  तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मनोहर संभाजी कुतवळ (Manohar Sambhaji Kutwal)  (३५ वर्ष ) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. (Shocking! Husband commits suicide due to lack of money for wife’s treatment)

या दुर्दैवी घटनेनं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 35 वर्षीय मनोहर संभाजी कुतवळ असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Related Posts
1 of 1,603

पोलिसांनी या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार मयत कुतवळ यांची पत्नी मागच्या काही दिवसांपासून आजारी होती. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर  औषधोपचार सुरु होते. रुग्णालयाने पैसे भरण्यास सांगितलं होतं. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, त्यामुळे मनोहर तणावात होता. त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करून करुन रुग्णालयात भरले होते. मात्र अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर पहाटे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.(Shocking! Husband commits suicide due to lack of money for wife’s treatment)

पुन्हा परीक्षा… , पुन्हा गोंधळ……., आरोग्य भरती पुन्हा चर्चेत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: