धक्कादायक! फेसबुकवर प्रेयसीच्या नवऱ्याशी केली मैत्री अन् भेटायला बोलावून ..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश पंडित यांच्या घराजवळच उज्ज्वल शर्माचं घर होतं. उज्ज्वल त्यांच्या दुकानात काम करत होता. त्यामुळेच पंडित यांच्या घरी उज्ज्वलचं येणं-जाणं होते. याचदरम्यान उज्ज्वल आणि नीलम देवी यांची ओळख झाली काहीदिवसांनी त्याचं रुपांतर प्रेमात झालं. मुकेश पंडित यांच्या कानामागे दोघांचं प्रेम प्रकरण सुरु होतं. मुकेश पंडित हा दोघांनाही त्यांच्या रस्त्यातील काटा वाटू लागला. त्यामुळे त्याला वाटेतून दूर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उज्ज्वल आणि नीलम या दोघांनीही मुकेशची हत्या करण्याचं ठरवलं.
उज्ज्वल शर्माने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊण्ट तयार केलं. मुकेश पंडित यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती स्वीकारताच त्यांच्याशी मेसेंजरवर चॅटिंगला सुरुवात केली. हळूहळू मैत्री वाढवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. 25 मार्चच्या रात्री उज्ज्वलने मुकेश यांना मेसेज करुन भेटायला बोलावलं. दामोदरपूर फुटबॉल ग्राऊण्डवर भेट झाल्यानंतर त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली.उज्ज्वलकडून पोलिसांनी पिस्तूल आणि मुकेश पंडित यांचा मोबाईल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.(Shocking! Friendship with the lover’s husband on Facebook and..)