धक्कादायक ! ‘या’ कारणाने बायकोनं काढला नवऱ्याचा काटा

0 347
Shocking! Another model commits suicide, another incident in three days
मालेगाव –  लग्नापूर्वी प्रियकरासोबत (Boy Friend) असलेल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा (Husband) पत्नीने (Wife) प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या टाकळी गावात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

 

Related Posts
1 of 2,326
 दीपक हिरामण सूर्यवंशी असे मयताचे नाव आहे.  पोलिसांनी या प्रकरणात पत्नी रोहिणी दीपक सूर्यवंशी आणि तिचा प्रियकर रवींद्र पवारला अटक केली आहे.  दीपकचा रोहिणी सोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र पवार या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात रोहिणीचा पती दीपक त्यांना अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी संगनमताने दीपकचा काटा काढायचं ठरवलं.

 

ठरल्या प्रमाणे बुधवारी रात्री दीपकचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तापसचक्रे फिरवत पत्नी रोहिणीची चौकशी केली. अवघ्या 24 तासात घडलेला प्रकार समोर झाला. पोलिसांनी संशयित आरोपी रविंद्र पवार व पत्नी रोहिणी सूर्यवंशीला ताब्यात घेतले. पोलिसांचा धाक दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: