धक्कादायक ! कामावरून काढून टाकल्याने; महिलेला जाळून टाकण्याचा प्रयत्न

0 158
Shocking! After calling the party, he committed murder and then took a selfie with the dead body
 पुणे –  पुण्यातील (Pune) वडगावशेरी (Wadgaon Sheri) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून दुकानाच्या मालकिणीला अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न (Attempt to burn) केला. या धक्कादायक घटनामध्ये आरोपीचा मृत्यू झाला असून संबधीत महिला गंभीर जखमी आहे.तर या दोघांना वाचविण्यासाठी आलेला व्यक्ती देखील गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावशेरी येथील रामचंद्र सभागृहाजवळ एक कपडे शिवण्याचे दुकान आहे. दुकानाच्या मालकिणीसोबत वाद झालेला आरोपी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिथे आली. त्यानंतर आरोपीने बाटलीत आणलेले रॉकेल महिलेच्या अंगावर टाकले. त्यानंतर त्या महिलेने आरोपीला मिठी मारली. त्यानंतर आरडाओरड सुरु असल्याचे पाहून शेजारच्या दुकानातील व्यक्ती ते पाहण्यासाठी गेला. त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र तो देखील या घटनेत जखमी झाला आहे. या घटनेंतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Related Posts
1 of 2,326

दरम्यान तिघांपैकी महिलेच्या अंगावर रॉकेल ओतणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. तर संबधित महिला आणि दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीला संबधित महिलेने कामावरून काढून टाकले होते. यावरून दोघांमध्ये यापूर्वी देखील वाद झाला होता. यातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर येत असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: