धक्कादायक ! सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याने केली आत्महत्या

0 332

यवतमाळ –  नव्याने माप ओलांडून घरात आलेल्या सुनेने काही दिवसातच पतीसह सासू सासऱ्यावर वर्चस्व मिळवत त्यांच्याशी वाद घालत अपमानास्पद बोलणे सुरु केल्याने सासऱ्याने पश्चात्तापाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली. साहेबराव दवणे (६५ रा. पंचशीलनगर लोहारा) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. (Shocking! Fed up with the persecution of Sune, his father-in-law committed suicide)

दवणे यांनी चार बचत गटाचे कर्ज उचलून मुलगा सूरज याचा विवाह करून दिला. नवीन सुनेने सासू-सासऱ्यांचा मान राखण्याऐवजी क्षुल्लक कारणावरून वाद घालणे सुरू केले.

लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरू नये असा दबाव पतीवर टाकला. सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. यामुळे मानसिक धक्का बसल्याने साहेबराव दवणे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून गळफास लावून घेतला.

ठाकरे- पवार यांच्या उपस्थित सोनिया गांधी घेणार 18 विरोधी पक्षांची बैठक

Related Posts
1 of 1,603

सासऱ्याच्या मरणाला सून कारणीभूत असल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध भादंवि ३०६, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. संध्या सूरज दवणे (ह.मु. पाचुंदा ता. माहूर जि. नांदेड) असे सुनेचे नाव आहे.(Shocking! Fed up with the persecution of Sune, his father-in-law committed suicide)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: