धक्कादायक ! दारू पिऊन सारसर्याची सुनेकडे शरीर सुखाची मागणी

0 572

श्रीगोंदा  :-   श्रीगोंदा तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावात चक्क सासर्याने सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी सासर्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shocking! father- in- law demands daughter-in-law body happiness after drinking alcohol )

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या दक्षिणेला असणारया एका गावात एक महिला आपल्या पतीसह व दोन मुलांसह शेतीवर उपजीविका करतात सदर फिर्यादी महिलेला अंगावर कोड फुटलेला असल्यामुळे घरातील लोक तिला कायम त्रास देतात काल दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी व तिची मुले जेवण करून झोपण्यासाठी दिवान वर गेले असता सदर महिलेचा सासरा दारू पिऊन तिच्याजवळ आला व तेच म्हणाला की मला तुझ्याजवळ झोपायचे आहेत तेव्हा सदर पीडित महिलेने तिला नकार दिला व हे जमणार नाही असे म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढून दिले.
Related Posts
1 of 1,603
 जाताना त्यांनी मोठ्या प्रमाणात सदर महिलेला शिवीगाळ केली.  तसेच सुने सबोत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.  तसेच सदर पीडित महिलेस मोठ्याप्रमाणात मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  सदर घटना घडली त्यावेळी महिलेचा पती त्याच्या बहिणीकडे गेला होता आल्या सदर प्रकार आल्यानंतर पत्नीने पती सांगितल्यानंतर फिर्यादी चे वडील यांनी येऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि 354, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल लता पुराने ही करत आहेत. (Shocking! father- in- law demands daughter-in-law body happiness after drinking alcohol )
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: