धक्कादायक ! अतिक्रमणचा वाद: एकास जीवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

0 250
Accused of kidnapping girl and keeping her in custody for 36 days threatens to kill victim's family

 

 

अहमदनगर – शासकीय जागेमध्ये केलेल्या अतिक्रमबाबत अर्जाच्या अनुषंगाने पाहणी करीत असताना एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच घरात घुसून महिलेचा विनयभंग करण्यात आला. शुक्रवारी दुपारी अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सचिन किसन पवार, राणी सचिन पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन पवार याने मोकल्ल्या जागेत अतिक्रमण करून फिर्यादी यांच्या कुटुंबास जाण्या-येण्यास अडथळा निर्माण केला आहे.

 

 

Related Posts
1 of 2,057

या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांचे पती तलाठी कार्यालयातील व्यक्तीसोबत सचिन पवार याने केलेल्या शासकीय जागेमधील अतिक्रमबाबत अर्जाच्या अनुषंगाने पाहणी करत असताना सचिन पवार त्याच्या कारमधून तेथे आला. त्याने कारमधून लाकडी दांडके काढून फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला.

 

 

फिर्यादी घरामध्ये असताना घरात प्रवेश करून त्यांचा विनयभंग करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. राणी पवार हीने सुध्दा शिवीगाळ करत धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: