DNA मराठी

धक्कादायक! डीजे वाजल्याने निघाले तलवारी; पाच जण जखमी

0 500
Shocking! DJ blows swords; Five people were injured

 

अहमदनगर – नगर तालुक्यातील हिवरेझरे शिवारात डिजे (DJ) वाजविण्यास विरोध केल्याने नऊ जणांच्या टोळक्याने पाच जणांना तलवार, लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

नगर तालुक्यातील हिवरेझरे शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. गंगुबाई जयसिंग काळे (वय ६०), गणेश जयसिंग काळे, माधव भानुदास काळे, भाऊसाहेब भानुदास काळे, कल्याण भगवंत काळे (सर्व रा. हिवरेझरे) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी मंगळवारी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात नऊ जणांविरूध्द मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Posts
1 of 2,448

जखमी गंगुबाई काळे यांनी फिर्याद दिली आहे. आप्पासाहेब गंगाराम काळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, ज्ञानेश्वर आप्पा काळे, तुषार भाऊसाहेब काळे, सचिन भाऊसाहेब काळे, जालिंदर गंगाराम काळे, नारायण गंगाराम काळे, नवनाथ विलास काळे, राहुल ज्ञानदेव भापकर (सर्व रा. हिवरेझरे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी फिर्यादी गंगुबाई व त्यांचा पुतण्या भाऊसाहेब भानुदास काळे हे दोघे भाऊसाहेब गंगाराम काळे यांना म्हणाले, तुम्ही आमच्या वस्तीजवळ डिजे वाजवू नका, असे म्हणताच आरोपींनी तलवार, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

 

भांडण सुरू असताना फिर्यादी यांच्या गळ्यातील गंठण व बोरमाळ तुटून गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक फौजदार बी. वाय. लबडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: