श्रीगोंदा :- श्रीगोंदा शहरानजीक मखरेवाडी येथील रहिवासी असलेल्या शितल गोविंद मखरे (वय वर्षे 29) यांनी राहते घरी दिनांक 4 मे 2022 रोजी रागाच्या भरात गोचिड मारण्याचे औषध प्राशन केले. यानंतर शीतल मखरे यांना त्रास होऊ लागल्या कारणाने श्रीगोंदा शहरातील होले हॉस्पिटल येथे औषध उपचाराकरता दाखल करण्यात आले होते.(Shocking! Death of a married woman due to poisoning.)
मात्र, उपचार चालू असतांनाच दिनांक 7 मे 2022 रोजी पहाटे 3:15 वाजता त्या मयत झाल्या आहेत. या घटनेबाबत मयत महिलेचा दीर दीपक विठ्ठल मखरे (वय 31 वर्षे राहणार मखरेवाडी) यांनी खबर दिली आहे. सदरील घटनेची खबर दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व विठ्ठल बडे (सहाय्यक फौजदार) यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बडे करीत आहेत. (Shocking! Death of a married woman due to poisoning.)