धक्कादायक ! बीएसएफ अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

0 177
Shocking! BSF officer commits suicide by shooting himself
प्रतिनिधी – DNA मराठी टीम 
त्रिपुरा – त्रिपुरा (Tripura) राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील धलाई जिल्ह्यात(Dhalai district) असणाऱ्या बीएसएफच्या (BSF)कॅम्पमध्ये एका बीएसएफ अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना  बुधवारी रात्री ९ च्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफ कॅम्पच्या मुख्य गेटवर ही घटना घडली.  बीएसएफचा हा कॅम्प धलाई जिल्ह्यातील जवाहरनगर भागात आहे.
Related Posts
1 of 2,427
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमके पारा (M.K.Para)असं मयत अधिकाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानचा (Rajasthan)आहे. तो धलाई सीमा चौकीवर तैनात होते. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

धलाईचे एसपी रमेश यादव यांनी सांगितले की, बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बीएसएफ अधिकाऱ्याला मृत अवस्थेत कुलाई जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बीएसएफ अधिकाऱ्याने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडल्याचे प्रथमदर्शनी दिसते. आम्ही मृत्यूची नोंद केली असून घटनेच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: