धक्कादायक ! प्रियकराने केला प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. दीड वर्षापासून संशयित साळवे सोबत तिचे प्रेमसंबंध आहे. दोघे एकत्र राहत असताना त्याची नजर मुलीवर होती. संशयित महिला कामावर गेल्यानंतर पीडित मुलीसाेबत अनैसर्गिक कृत्य करत होता.
याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले होते. दमदाटी करत संशयिताने मुलीच्या लहान भावालाही असे कृत्य करण्यास भाग पाडत त्याचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. मुलीला त्रास झाल्यानंतर हा प्रकार आईच्या लक्षात आल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. पथकाने संशयिताचा माग काढत त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.