मामी म्हटल्याचा आला राग अन् घडली धक्कादायक घटना ..

मुंबई- भाजी विक्रेता च्या पत्नीला मामी म्हटल्याचा भाजी विक्रेत्याला राग आल्याने एका ग्राहकाला वजनाच्या लोखंडी मापाने मारहाण केल्याची धक्कादायक घटनाबागलाण तालुक्यातील वटार येथे घडली.
अशोक खैरनार (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सटाणा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खैरनार बुधवारी रोजी कांदे विकण्यासाठी उमराणे मार्केट येथे गेले होते. सायंकाळी घरी परत जात असताना वटार गावाचा आठवडे बाजार असल्याने एका भाजीच्या दुकानात मामी दोडके द्या, अशी मागणी केली.
याचा भाजीपाला विक्रेत्याला राग आल्याने माझ्या पत्नीला मामी म्हणायचे नाही असे बोलून अशोक खैरनार यास शिवीगाळ करून केली. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात संजय खैरनार व दीपक खैरनार या दोन्ही पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.