धक्कादायक…. ! पतीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

0 416

पाटणा –   बिहारमधील मुजफ्फरपूरच्या सिकंदरपूरनगर पोलीस ठाण्यात परिसरात महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेहावर रसायन टाकून या गुन्ह्याचे सर्व पुरावे नष्ट (Evidence) करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला  मात्र एका रासायनिक स्फोटानंतर पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यात ३० वर्षीय राकेश याची पत्नी राधा, तिचा प्रियकर सुभाष, राधाची बहीण कृष्णा आणि तिच्या पतीचा समावेश आहे.

राकेश याची हत्या केल्यानंतर गुन्ह्याचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी  सुभाषने या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर, सुभाष आणि राधा यांनी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हा मृतदेह नष्ट करण्यासाठी  रसायनांचा वापर केला. मात्र, रसायनांच्या वापरामुळे झालेल्या स्फोटानंतर स्थानिक रहिवाश्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना फ्लॅटमध्ये एका मृतदेहाचे तुकडे विखुरलेले दिसले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि फॉरेन्सिक टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपास करत असताना हा मृतदेह सिकंदरपूर येथील रहिवासी असलेल्या राकेशचा असल्याची माहिती समोर आली . मृत राकेश बिहारमध्ये दारूबंदीनंतरही अवैध दारू व्यवसायात गुंतलेला होता. तो बिहार पोलिसांच्या रडारवर होता. त्यामुळे, राकेश बहुतेक वेळा वेगवगेळ्या ठिकाणी गुप्तपणे राहत असे. या काळात राकेशचा साथीदार असलेला सुभाष त्याच्या पत्नीची काळजी घ्यायचा. काही काळानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.पुढे राधा आणि सुभाषने राकेशला आपल्या मार्गातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या कटात राधाची बहीण आणि तिच्या बहिणीचा नवरा हे देखील सामील होते. राधाने तीजच्या निमित्ताने राकेशला घरी बोलावले. त्यानंतर, आपला प्रियकर सुभाष याच्या मदतीने त्याची हत्या केली.

”राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला”- शिवसेना नेते अनंत गीते

गुन्हा दाखल 

राकेशच्या हत्येनंतर त्याचा भाऊ दिनेश साहनीने राधा, तिचा प्रियकर सुभाष, बहीण कृष्णा आणि कृष्णाच्या पतीवर हत्येचा आरोप करत पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. दिनेश साहनीने असा दावा केला आहे की, त्याच्या मोठ्या भावाच्या पत्नीचे त्याच्या सहकारी सुभाषसोबत अनैतिक संबंध होते. त्याचसोबत, त्यांच्या या संबंधांबद्दल सर्वांना माहिती होती. दिनेशच्या वक्तव्यानुसार राकेश काहीच दिवसांपूर्वी आपल्या घरी परतला होता आणि भाड्याच्या घरात राहत होता. दिनेश साहनीने पुढे सांगितलं की, शनिवारी घरात अचानक स्फोट झाल्याचं समजल्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला. तेव्हा त्याला कळलं की त्याच्या भावाची हत्या करण्यात आली असून त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत.

हे पण पहा – Exclusive : १८ सेकंदात ३ मजली इमारत जमीनदोस्त!

Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: