धक्कादायक! भाजपाच्या माजी आमदाराचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न

0 328

 अहमदनगर –  जिल्हयात  कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजपा (BJP) ने आक्रमक भूमिका घेतली असून नेवासा येथील शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात आंदोलन करताना  भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी वीज वितरणच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Shocking! Attempt to commit suicide by strangling former BJP MLA)

मिळालेल्या माहितीनुसार नेवासा येथील वीज तोडणीविरोधात भाजपातर्फे वितरण कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात येत होते. यावेळी भाजपाकडून पुन्हा एकदा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत होती. बाळासाहेब मुरकुटे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन करुनही मागणी मान्य होत नसल्यामुळे मुरकुटे यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 हे पण पहा – दिलीप सातपुते यांची शिवसेना शहर प्रमुख पदावरून उचलबांगडी

यावेळी तिथे उपस्थित इतर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी मुरकुटेंना रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  (Shocking! Attempt to commit suicide by strangling former BJP MLA)

सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या, पतीसह तिघांना अटक

Related Posts
1 of 1,463
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: