धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर 28 जणांकडून अत्याचार , सात आरोपीला अटक

0 400

ललितपूर-   देशातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक असलेला उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील ललितपूर (Lalitpur) येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ( minor girl) तब्बल 28 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी २८ जणांवर गुन्हा दाखल केला असून आता पर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.(Shocking! Atrocities against a minor girl by 28 people, seven accused arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे वडिलांचा देखील आरोपी म्हणून नाव आहे तर इतर आरोपीमध्ये उत्तर प्रदेशमधील दोन मोठ्या राजकीय पक्षातील जिल्हाध्यक्षाचा देखील समावेश आहे.  मागच्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते.ललितपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 28 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन अज्ञात आहेत. आरोपींमध्ये वडील, राजकीय नेत्यासोबत नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसंच दंड अधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने आपला पती 10 वर्षाच्या मुलावरही लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पीडित मुलगी आणि कुटुंबाला सुरक्षा दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

फर्निचर कारखान्यांना भीषण आग.., 5 कारखाने जळून खाक

Related Posts
1 of 1,463

ललितपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलगी व तिच्या आईने आरोप केले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला जात असल्याचा आरोप केला. जेव्हा आपण सहावीत होतो तेव्हा वडिलांनी जबरदस्ती अश्लील व्हिडीओ दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितले आहे. यानंतर आरोपी पित्याने मुलीला शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घेऊन गेला, जिथं तिच्यावर लोकांनी बलात्कार केला. वडिलांनी धमकावले असल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नव्हती. यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.(Shocking! Atrocities against a minor girl by 28 people, seven accused arrested)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: