धक्कादायक ! सलूनमध्ये केस कापताना आठ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे

0 315

पुणे –   पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मधील एका केशकर्तनकारा (Hairdresser) ने आठ वर्षीय मुलीचे केस कापताना अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात  पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी केशकर्तनकाराला अटक केली आहे. पीडित मुलीचे केस कापताना तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं आरोप आहे. (Shocking! An obscene joke with an eight year old girl while cutting her hair in a salon)

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत चिखली परिसरातील सलूनमध्ये हेअर कट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने या मुलीला हेअर कट करण्यासाठी खुर्चीत बसवले. हेअर कट करत असताना आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अश्लील कृत्य केल्याचं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

स्मृती इराणींना कपिल शर्माच्या सेटवर नो एंट्री ! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Related Posts
1 of 1,487

हेअर कट झाल्यानंतर मुलगी आजीसोबत घरी आली, तेव्हा तिने घडलेला प्रकार आई आणि आजीला सांगितला. पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाणे गाठत केशकर्तनकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती पोलीस अधिकारी वसंत बाबर यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करत आहेत.  (Shocking! An obscene joke with an eight year old girl while cutting her hair in a salon)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: