धक्कादायक! तुनिषानंतर ‘या’ तरुण अभिनेत्याने केली आत्महत्या! बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा

Sudheer Varma Suicide: साउथ इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील तरुण अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. वृत्तानुसार, अभिनेत्याने सोमवारी आत्महत्या केली. वैयक्तिक कारणावरून त्यांनी हे पाऊल उचलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारी रोजी अभिनेता सुधीर वर्माने वारंगलमध्ये काही प्रकारचे विषारी पदार्थ प्राशन केले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने ते हैदराबाद येथील नातेवाईकाच्या घरी गेले. विषारी द्रव्य प्राशन केल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले, त्यानंतर त्यांना उस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
21 जानेवारी रोजी सुधीरला विशाखापट्टणम येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान सोमवार, 23 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. तपासानंतर सुधीर वर्मा यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सुधीरच्या मित्रांनी ट्विट केले
सुधीर वर्मा यांचे मित्र आणि सहकलाकार सुधाकर कोमाकूल यांनी त्यांच्या एका ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुधाकर यांनी ट्विट करून सुधीर वर्मा यांच्या निधनाची पुष्टी केली. तो लिहितो, ‘एवढी सुंदर आणि छान व्यक्ती… तुझ्यासोबत काम करून छान वाटलं. विश्वास बसत नाही की तू आता या जगात नाहीस. ओम शांती.’ सुधाकरशिवाय अभिनेत्री चांदनी चौधरीनेही ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, ‘सुधीर, तुझ्या जाण्याने माझे हृदय तुटले आहे. तू एक उत्तम सहकलाकार आणि चांगला मित्र होतास. आम्ही तुम्हाला मिस करू.
या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली
सुधीर वर्मा यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, सध्या याप्रकरणी तपास सुरू आहे. सुधीर यांच्या जाण्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी सर्वांनाच धक्का देणारी आहे. सुधीर वर्मा यांनी ‘कुंदनापू बोम्मा’ या चित्रपटात काम केले होते. याशिवाय तो ‘शूट आउट इन अल्लायर’ या वेब सीरिजसाठीही ओळखला जातो.
गेल्या महिन्यात टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले होते. 20 वर्षीय तुनिषाने तिच्या अलिबाबा: दास्तान-ए-काबुल या टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. या प्रकरणात तिचा एक्स प्रियकर आणि सहअभिनेता शीजान खान याला मुंबई पोलिसांनी पकडले.
आता आणखी एका तरुण अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतल्याचे खूप दुःख आहे.