धक्कादायक ! पार्टीला बोलवून केली हत्या अन्.. नंतर काढली मृतदेहासोबत सेल्फी

दरम्यान, रविचंद्रनची बायको किर्तना त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फोन बंद लागत होता. त्यामुळे घाबरलेल्या किर्तना यांनी आपल्या काही नातेवाईकांसोबत पतीला शोधायला सुरुवात केली. संबंधित सर्वजण वेट्री नगर परिसरातील मैदानात पोहोचले असता त्यांना रविचंद्रनचा मृतदेह त्याठिकाणी दिसला. यावेळी चारही आरोपी मृतदेहासोबत सेल्फी फोटो काढत होते. नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आसपास पडलेल्या पुराव्यानुसार आरोपींनी दारुची बाटली डोक्यात घालून ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
संबंधित हत्या आम्हीच केलीये, याचा पुरावा मित्रांना दाखवण्यासाठी आरोपींनी मृतदेहासोबत सेल्फी काढली होती. पण संबंधित सेल्फी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. संबंधित सेल्फीमुळेच आरोपींची ओळख पटल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.