धक्कादायक ! व्हिडिओ कॉल करून अभिनेत्रीने केली आत्महत्या

0 340
Shocking! Actress commits suicide by making video call

 

मुंबई –   साऊथ अभिनेत्री (South Actress) शेरीन सेलीन मॅथ्यू (Sherin Celin Mathew) यांचे मंगळवारी निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी 26 वर्षीय ट्रान्सवुमन मॉडेल तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. आत्महत्या करताना अभिनेत्री ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅटिंग करत होती, त्या व्यक्तीने शेरीनच्या हालचालीची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. मात्र, पोलिस अधिकारी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले तोपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 

शेरीन डिप्रेशनची शिकार होती
पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, शेरीनच्या जवळच्या लोकांनी माहिती दिली आहे की अभिनेत्री डिप्रेशनने त्रस्त होती आणि गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. या घटनेसंदर्भात पोलीस शेरीनच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवत आहेत. तपास प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह कलामसेरी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात येणार आहे.

 

Related Posts
1 of 2,399

शेरीन कोण होती?
शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आणि मॉडेलिंगमध्ये सक्रिय होती. कोचीमध्ये गेल्या वर्षभरात ट्रान्सजेंडरने केलेल्या आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: