धक्कादायक ! बनावट फोटो लावून जमीन केली संपादन , गुन्हा दाखल

0 556
श्रीगोंदा ;-   श्रीगोंदा तालुक्यात सध्या कुकडीच्या चाऱ्याचे तसेच पोटचाऱ्यांचे जमीन संपादन करून त्याचा मोहबदला देण्याची प्रक्रिया चालू आहे याच प्रक्रियेसाठी नागरिकांचे सातबारे जमीन मालकाचे फोटो अशी अनेक प्रकारची कागदपत्रे गोळा केली जात आहेत अशीच बनावट कागदपत्रे तयार करवून मोबदल्याची रक्कम रुपये 38,36,526/-ही चेक नं.101574 अन्वये तोतयेगिरी व फसवणुक करुन खोटे व बनावट कागदपत्र (fake photos) तयार करुन संपादीत जमीनीची रक्कम घेउन फसवणुक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कुकडी वितरिका तसेच त्याच्या पोटाचाऱ्या यांचे सर्व क्षेत्र संपादन करवून त्याचा मोहबदला देण्याचे काम महाराष्ट्र सरकारकडून सुरु आहे त्यानुसार शेडगाव येथील गट न १३३ मधील चारी न १४  चे  भूसंपादन न झालेल्या  सौ जयश्री नितीन लांडगे  श्री नितीन मधुकर लांडगे 3)सुरज नितीन लांडगे लांडगे तिनही रा.सिमला निवास,अ-6 घर नं.1075 रोड नं.1,सत्यपुरम  सोसायटी समोर तुकाई दर्शन,फुरसुंगी,पुणे.412308, दादासाहेब पंढरीनाथ कोल्हे रा.ता.कर्जत जि.अहमदनगर यांनी संगमताने शेडगाव येथिल गट नं.133 पैकी चारी नं.14 साठी 0 हेक्टर 76 आर क्षेत्र संपादित झालेले नसताना सदर गटातील साक्षीदार यांचे नावापुढे दुसऱ्याच ईसमाचे फोटो लावुन त्याच्या खोट्या सह्या /अंगठे केले. व क्षेत्राच्या मोबदल्याची रक्कम रुपये 38,36,526/-ही चेक नं.101574 अन्वये तोतयेगिरी व फसवणुक करुन श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयात खोटे व बनावट कागदपत्र तयार करुन संपादीत जमीनीची रक्कम घेउन फसवणुक केली आहे.
Related Posts
1 of 1,301
याप्रकरणी  सुहास विलास भाकरे वय-42 धंदा-नोकरी लिपीक-नि-टंकलेखक कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी रा.कोळवडी ता.कर्जत जि.अहमदनगर  यांच्या फिर्यादीवरून सौ जयश्री नितीन लांडगे नितीन मधुकर लांडगे सुरज नितीन लांडगे तिनही रा.सिमला निवास,अ-6 घर नंयांच्यावर .1075 रोड नं.1,सत्यपुरम  सोसायटी समोर तुकाई दर्शन,फुरसुंगी,पुणे.412308  दादासाहेब पंढरीनाथ कोल्हे रा.ता.कर्जत जि.अहमदनगर यांच्यावर भा द वि का क 420,416,419,463,465,467,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास स.पो.नि.तेजनकर हे करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: