धक्कादायक! आरोपीने केला पोलिसांवरच तलवारीने हल्ला; गोळीबारात आरोपी जखमी

0 245
Atrocities filed in assault case; Success in pursuit of backward class organizations

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

नांदेड –  काही दिवसांपूर्वीच नांदेड शहरात (Nanded City) बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.  या हत्येनंतर पोलिसांनी शहरासह जिल्ह्यातील रेकॉर्ड असणाऱ्या गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.  रेकॉर्डवरील गुन्हेगारांने पोलिसांवरच तलवारीने हल्ला (sword)केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Related Posts
1 of 2,326
रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांचा वाहनावर दगडफेकही करण्यात आली आहे. वसरणी भागात हा हल्ला करण्यात आला आहे. पोलीस रेकॉर्डवरील आरोपी संजुसिंघ बावरी याने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शिवा पाटील यांच्या खांद्यावर तलवारीचा वार लागल्याने तो जखमी झाले  तर सहाय्यक पोलिस निरीक्षक संकेत दिघे हे थोडक्यात बचावले.
यावेळी पोलिसांनी जीव धोक्यात असल्याचे पाहून अखेर आरोपी बावरीवर गोळीबार केला. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गोळी झाडली. या घटनेत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला संजुसिंघ बावरी याला पकडण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक वासारणी येथे गेले होते. बावरी हा त्याच्या घरी असताना पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण संजूसिंघ बावरी याने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. यावेळी पोलिस कर्मचारी शिवा पाटील यांच्या खांद्यावर तलवारीचा वार लागला.
बावरी याने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी त्याच्यावर गोळी झाडली. यात आरोपी बावरी याच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. जखमी आरोपी आणि जखमी पोलिस कर्मचाऱ्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: