धक्कादायक ! फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने केला बलात्कार, आरोपीला अटक

0 347
Shocking! Accused arrested for rape by friend identified on Facebook

 लखनौ –   फेसबुकवर (Facebook)  मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक केली. गुप्ता याने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली. (Shocking! Accused arrested for rape by friend identified on Facebook)

पीडित युवती ही येथील तालकटोरात राहणारी असून तिची भेट सनी गुप्ता याच्याशी फेसबुकवर २०१९ मध्ये झाली. सनी गुप्ता हा या मैत्रीनंतर सतत तिच्याशी बोलायचा. दरम्यान, गुप्ता लखनौला येऊन तिला भेटला. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन हॉटेलमध्ये बोलावले. तेथे गुंगी आणणारे पदार्थ तिला खाऊ घालून बलात्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ त्याने बनवला आणि तिला तो दाखवून ब्लॅकमेल करायचा. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला.

देशात पुन्हा लॉकडाऊन ? केंद्र सरकारने दिला “हा” संकेत ….

Related Posts
1 of 2,107

व्हिडिओची धमकी
वारंवार बोलावल्यानंतर तिने त्याला नकार दिल्यावर गुप्ता याने सो व्हिडिओ तिच्या वडिलांना त्यांच्या मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले तसेच व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याचीही धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटल्याचे उपपोलीस अधीक्षक ख्याती गर्ग यांनी सांगितले. (Shocking! Accused arrested for rape by friend identified on Facebook)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: