धक्कादायक !पगार वेळेवर न दिल्याने मालकाच्या चार वर्षे मुलाचा अपहरण, गुन्हा दाखल

0 233

नवी मुंबई –  मुंबई(Mumbai) मधील चेंबूर (Chembur) परिसरात एक वेगळीच घटना घडली आहे .मालका (owner)ने पगार वेळेवर न दिल्याने एका व्यक्तीने चक्क मालकाच्या चार वर्षाच्या मुलाच्या अपहरण (kidnapping) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रामपाल उर्फ ​​अजय तिवारी असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.(Shocking! Abduction of owner’s four-year-old son for non-payment of salary on time, case filed)

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार तिवारी हे पीडितेचे वडील महेंद्र बलोटिया यांच्या दुकानात काम करायचे. पगार न मिळाल्याने रामपालचे महेंद्रशी भांडण झाले, त्यामुळे रागाच्या भरात त्याने मुलाचे अपहरण केले.इंदिरा नगर येथील ठक्कर बाप्पा कॉलनी येथे ८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडितेच्या ६२ वर्षीय आजोबांच्या तक्रारीवरून त्याच रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडितेच्या वडिलांच्या दुकानात कर्मचारी आहे. काही दिवसांपूर्वी पगाराच्या उशीरावरुन मालकासोबत वाद झाला होता. त्यानंतर बदला घेण्यासाठी आरोपीने त्याच्या मालकाच्या मुलाचे अपहरण केले.

पोलिसांनी सांगितले की, त्यांनी पीडितेच्या माध्यमातून रामपालच्या नंबरवर संपर्क साधला असता त्याने तो शहरातील कुर्ला येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले असता तो कल्याणमध्ये होता. नंतर त्याचे लोकेशन नाशिक रोडवर सापडले. यानंतर नाशिक पोलिसांना आरोपीची माहिती देण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आरोपी आणि मुलाला ताब्यात घेऊन मुंबईत आणले.

Related Posts
1 of 1,603

राज्यात ड्रीम 11 वर येणार बंदी… ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आरोपींनी मुलाला सोडण्यासाठी ५० हजार रुपयांचीही मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.  (Shocking! Abduction of owner’s four-year-old son for non-payment of salary on time, case filed)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: