DNA मराठी

धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खरेदीसाठी निघालेला तरुणावर चाकूने हल्ला अन्..

0 264
Shocking! A young man who went shopping on his wedding day was attacked with a knife.

 

दिल्ली –   देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) कल्याणपुरी भागात बुधवारी एका तरुणाची पत्नीसमोरच चाकूने वार करून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सचिन उर्फ बाबा (25) असे मृताचे नाव आहे. नवऱ्याला वाचवण्यासाठी सचिनची पत्नी लोकांकडे मदतीची याचना करत राहिली, पण लोक प्रेक्षक बनून राहिले .

 

घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. सचिनची पत्नी खुशीने पतीला एका खाजगी वाहनातून जवळच्या एलबीएस रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचे समजते. मयत सचिनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचाही एका टोळीशी संबंध होता. मात्र, पोलिस अधिकारी टोळीयुद्धाची चर्चा नाकारत आहेत. सायंकाळी उशिरा पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी कल्याणपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Related Posts
1 of 2,448

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आपल्या कुटुंबासह त्रिलोकपुरी भागात पाच ब्लॉकमध्ये राहत होता. सचिनच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी ते पत्नीसह त्रिलोकपुरी 6-ब्लॉक येथे खरेदीसाठी आले होते. दरम्यान, दोन आरोपींनी सचिनला घेरले. प्रथम आरोपीने त्याच्यावर विटेने हल्ला केला. त्यानंतर त्याने चाकू काढून त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. खुशीने पतीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आरोपींनी सचिनवर डझनहून अधिक चाकूचे वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.

सचिनवर अनेक गुन्हे दाखल आहेत
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचाही एका टोळीशी संबंध होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सचिन आणि त्याचा मित्र अभिमन्यू यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अभिमन्यूचा मृत्यू झाला तर सचिन गंभीर जखमी झाला. त्या खटल्यात सचिन हा एकमेव साक्षीदार होता. विरोधी टोळी सचिनला या प्रकरणातून दूर राहण्याची धमकी देत होती. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते. अटक आरोपींची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Shocking! A young man who went shopping on his wedding day was attacked with a knife.)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: