धक्कादायक ! पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी घरात घुसून महिलेचा विनयभंग

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा ;- श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या गावात महिलेने पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी महिला एकटी असताना तिघांनी घरात घुसून मारहाण करत विनयभंग केला . याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related Posts
श्रीगोंदा तालुक्याच्या राजधानीत 20 मार्च रोजी 8 चे सुमारास फिर्यादी घरात एकटीच असताना तीन इस्मानी घरात शिरून फिर्यादिस म्हटले की तू आमच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घे नाहीतर त्याचे परिणाम वाईट होईल असा सज्जड दम भरला मात्र फिर्याद देणाऱ्या पीडित महिलेने त्यास साफ नकार दिल्याने केस मागे घेण्याच्या कारणावरुन फिर्यादीशी अंगलट करुन फिर्यादीचे कपडे फाटुन तिचा विनयभंग केला व जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले परंतु श्रीगोंदा पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दाद न दिल्याने संबंधित पीडित महिलेने अहमदनगर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने दि 2 एप्रिल रोजी त्या तीन नराधमावर भा.दं.वि.का.कलम 452,354,509,506,34 प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.एन.के.भैलुमे, हे करत आहेत.