धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून नेऊन केला अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर पीडित मुलीला सोबत घेऊन गेला. पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. मुलगी बराच वेळ झाला घरी परतली नसल्यामुळे सगळीकडे तिचा शोधाशोध सुरू झाला. रात्री उशिरा मुलगी घरी आली. तिची विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.
या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपी अजय गायकवाडविरोधात बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.(Shocking! A minor girl was abducted from school and tortured)