धक्कादायक ! मनोरुग्ण पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून केलें ठार

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे घरगुती कारणाने मनोरुग्ण पतीने ५७ वर्षीय पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार मारल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. संगीता रोहीदास पंदरकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती रोहिदास पंदरकर हा पोलिस पाटील शिवणकर यांच्या सोबत स्वतः होऊन पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान रोहिदास हा मनोरुग्ण असून मागील काही वर्षांपासून औषध गोळ्या सुरू आहेत. यातून हे क्रूर कृत्य केले असावे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की पिंपळ गाव विसापूर रस्त्यावरील पंदरकर मळ्याच्या शिवारात रोहिदास पंदरकर आपल्या पत्नी मुलांसोबत सोबत वास्तव्यास होते. शनिवारी पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास पत्नी संगीता पंदरकर हिच्या गळ्यावर धारदार कुऱ्हाडीने घाव घातला त्यात वय ५७ वर्षे असलेली संगीता पंदरकर गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
Related Posts
सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसाचे पोलिस पाटील सुनील शिवणकर यांनी बेलवंडी पोलीसांना सदरील घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक बोत्रे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस पंचनामा केला. मृत महिलेचे शवविच्छेदन श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पत्नीचा खुण करण्यामागचा उद्देश मात्र स्पष्ट होवू शकलेला नाही.
मात्र कौटुंबिक कारणामुळे खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात मयतचा भाऊ नाना खंडू काळे रा. वडाळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्या नंतर आरोपी हा पोलिस ठाण्यात पोलिस पाटील सुनील शिवणकर यांच्या सोबत स्वतः होऊन हजर झाला असून मारेकरी रोहिदास याला पोलिसांनी अटक केली आहे.