धक्कादायक ! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळून भीषण अपघात

0 242

नवी मुंबई –   मेघालय (Meghalaya) मधील नोंगच्रा (Nongchara) परिसरातील रिंगडी नदीत (Ringadi River) बुधवारी दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री १२ च्या सुमारास प्रवाशांनी (Passengers ) भरलेल्या बसचा (Bus) नदीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये आता पर्यंत  सहा जणांचा मुत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Shocking! A bus full of passengers crashed into a river and caused a terrible accident)

अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. या बचाव कार्यादरम्यान, आतापर्यंत चार मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर दोन मृतदेह अजूनही बसमध्येच असल्याची माहिती समोर आली असून या मृतांमध्ये बस चालकाचा देखील समावेश आहे.

हे पण पहा  –उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा | दादा मला पाच मिनिट वेळ द्या

Related Posts
1 of 1,487

मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये एकूण २१ प्रवासी प्रवास करत होते.  या अपघातानंतर बसमधून २१ पैकी १६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात नोंगश्रम पुलावर झाला. हा भाग ईस्ट गारो हिल्स आणि वेस्ट खासी हिल्स जिल्ह्याची सीमा आहे. या बसमधील काही जखमी प्रवाशांनी येथील स्थानिकांना सांगितलं की, हा अपघात झाला तेव्हा बस वेगात होती. यावेळी, बसचा पुढचा भाग पुलाच्या कडांना आदळला आणि बस पाण्यात कोसळली, अशी माहिती मिळाली आहे.    (Shocking! A bus full of passengers crashed into a river and caused a terrible accident)

धक्कादायक ! पतीच्या निधनानंतर पत्नीची ही रेल्वेखाली आत्महत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: