धक्कादायक ! १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ८० नराधमांचा आठ महिने बलात्कार

0 373
Shocking! Sexual abuse of a minor grandchild showing porn
 तेलंगणा –  १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ महिने ८० नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सर्व ८० आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. गुंटूर येथून या मुलीची सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Related Posts
1 of 2,326

पोलिसांनी मंगळवारी १० जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्याचाही समावेश आहे. अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीची आई कोरोना झाल्याने जून २०२१ मध्ये रुग्णालयात दाखल होती. यावेळी सवर्ण कुमारी नावाच्या एका महिलेने तिच्या आईशी मैत्री केली होती. उपाचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्यानंतर महिलेने तिच्या वडिलांना माहिती न देता सोबत घेऊन गेली होती.

ऑगस्ट २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना मुख्य आरोपी असणाऱ्या सवर्ण कुमार या महिलेची ओळख पटली. जानेवारीमध्ये याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली. आणि मंगळवारी १९ एप्रिलला पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता तसंच मुलीकडे विचारपूस केली असता संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम समोर आला. गेल्या आठ महिन्यांपासून या १३ वर्षीय मुलीला आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या वेश्यागृहात देहव्यापारासाठी पाठवलं जात होतं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सवर्ण कुमारी या महिलेला मुलीला जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याने मुख्य आरोपी केलं.

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ८० आरोपींची ओळख पटली असून यापैकी काही दलाल तर काही ग्राहक आहेत. “मुलीचं वय आणि तिच्या परिस्थितीचा फायदा घेत अनेकांनी तिला खरेदी केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत देहव्यापार करण्यास भाग पाडलं,” असं त्यांनी सांगितलं आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: