धक्कादायक ! मोबाईलवर गेम खेळण्यासाठी आईने रोखल्यामुळे 10 वर्षीय मुलीने केली आत्महत्या

Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलवर गेम खेळत असल्याने आईने मुलीला रोखल्याने पारा परिसरात एका 10 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हे प्रकरण पारा येथील बलदेव खेडाचे आहे. हर्षिता वाजपेयी असे मृत मुलीचे नाव असून ती तिच्या आईसोबत राहत होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते.
हर्षिता सहावीत शिकत होती आणि तिचे मन अभ्यासात गुंतत नव्हते. ती अनेकदा मोबाईलवर गेम खेळायची, यासाठी तिची आई नीतू तिला नकार देत असे.
मंगळवारी नीतूने आपल्या 10 वर्षांच्या मुलीला ऑनलाइन गेम खेळण्यास नकार दिला आणि नंतर ती दुसऱ्याच्या घरी कामाला गेली.
पतीच्या निधनानंतर हर्षिताची आई नीतू उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी काम करायची. हर्षिताची आई कामावर गेली असता तिने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
नीतू कामावरून परतल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचवेळी आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पारा पोलिस स्टेशनचे प्रभारी तेज बहादूर सिंह यांनी सांगितले की, 10 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे, ज्याचा तपास सुरू आहे.