धक्कादायक! एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या; गुन्हा दाखल

0 372
Shocking! 5 members of the same family killed; Filed a crime

प्रयागराज –  उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून (Prayagraj) एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजच्या गंगापार परिसरातून पुन्हा एकदा सामूहिक हत्येची घटना समोर आली असून, येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आहे. माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु केला आहे. (Shocking! 5 members of the same family killed; Filed a crime)

हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेवरजपूर गावचे आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहितीनंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

या लोकांची हत्या
या सामूहिक हत्येमध्ये राजकुमार यादव (वय 55 वर्षे), कुसुम (वय 50 वर्षे), मनीषा (वय 25 वर्षे),सविता (वय 30 वर्षे) आणि मीनाक्षी (वय 2 वर्षे) यांचा खून करण्यात आला आहे.

Related Posts
1 of 2,420

16 एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह सापडले होते

16 एप्रिललाही प्रयागराज जिल्ह्यातील गंगापार नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरात आढळून आले होते. कुटुंबप्रमुख राहुलचा मृतदेह साडीच्या फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. राहुल व्यतिरिक्त, कुटुंबातील इतर चार सदस्य – राहुलची पत्नी आणि तीन मुली – त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राचे वार आढळून आले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Shocking! 5 members of the same family killed; Filed a crime)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: