धक्कादायक… ! एकाच कुटुंबातल्या ५ जणांची आत्महत्या …..

0 455

नवी मुंबई –   बंगळुरमध्ये एकच कुटूंबातील पाच जणांनी आत्महत्या (Five members of the family commit suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  या घटनेनंतर त्या घरातल्या एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं तडफडून मृत्यू झाल्याची देखली माहिती समोर आली आहे. तर  एक अडीच वर्षांची मुलगी वाचली आहे  घरातीलच एक सदस्य काही दिवसांनी बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊ या प्रकरणाचा तपशील घेतला असून त्याविषयी पुढील तपास सुरू केला आहे.(Shocking …! 5 members of the same family commit suicide …..)

Related Posts
1 of 1,622
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती (५४), सिंचना (३४), सिंधुराणी (३१) आणि मधूसागर (२५) अशी मृतांची नावं आहेत. या सगळ्यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचसोबत एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर आढळून आला. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारात एक अडीच वर्षांची मुलगी मात्र वाचली आहे. या मुलीला तातडीने तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रकरण काय  

हा सगळा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. घरातील एक सदस्य हलेगिरी शंकर हे बाहेरगावाहून चार ते पाच दिवसांनंतर घरी परतले, तेव्हा घर आतून बंद होतं. अनेकदा वाजवूनही कुणीच घर उघडलं नाही तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना चार जणांचे मृतदेह घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याचवेळी ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पलंगावर होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अडीच वर्षांची मुलगी या प्रकारात जिवंत वाचली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी भारती या शंकर यांच्या पत्नी आहेत. इतर तिघेजण त्यांची मुलं असून दोघे चिमुरडे त्यांचे नात-नातू आहेत. (Shocking …! 5 members of the same family commit suicide …..)

राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसते त्यामुळे ….   विखे पाटील

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: