धक्कादायक ! 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या…, तपास सुरु

0 319
 नवी मुंबई –   अंधेरी भागातील आपल्या राहत्या घरी स्वतःला पंख्याने गळफास घेऊन 40 वर्षीय सुरेश चव्हाण या  पोलीस कॉन्स्टेबलने (police constable)  आपला आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. मात्र सुरेश चव्हाणांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.(Shocking! 40-year-old police constable commits suicide …, investigation begins)

मिळालेल्या माहिती नुसार सुरेश चव्हाण हे ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. रविवारी दि २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह भावाकडे गेली होती. रात्री उशिरा तिघं घरी आले तेव्हा दरवाजा वाजवूनही बराच वेळ आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या पत्नीने दरवाजा तोडला, तेव्हा सुरेश चव्हाण हे खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

मोठी बातमी ! नारायण राणेंना अटक होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Related Posts
1 of 1,487

 सुरेश चव्हाण यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप ही समजलेलं नाही.(Shocking! 40-year-old police constable commits suicide …, investigation begins)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: