
पाटणा – बिहार (Bihar) राज्यात पुन्हा एकदा वादळी पाऊसामुळे धक्कादायक आणि दुर्देवी घटना घडली आहे. बिहारमधील १६ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून ३३ जणांचा मुत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्देवी घटनांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Modi )शोक व्यक्त केला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने मद्दत कार्य सुरु केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पीडित कुटुंबांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला तसेच मृतांच्या आश्रितांना प्रत्येकी 4 लाख रुपये तत्काळ अनुदान देण्याचे निर्देश दिले आहे.
मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे खूप दुःख झाले आहे. देव शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात सक्रियपणे सहभागी आहे.
पीडित कुटुंबांसोबत- मुख्यमंत्री
गुरुवारी वादळामुळे भागलपूरमध्ये 7, मुझफ्फरपूरमध्ये 6, सारणमध्ये 3, लखीसरायमध्ये 3, मुंगेरमध्ये 2, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहारमध्ये 2 तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या आपत्तीच्या काळात आपण पीडित कुटुंबांसोबत आहोत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीनं देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पिकांचं नुकसान
वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या सहा बोटी गंगेत बुडाल्या. सुमारे 50 मजुरांनी पोहून त्यांचे प्राण वाचवले.
हवामानशास्त्रज्ञ आशिष कुमार यांच्या मते, वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानात झालेली वाढ आणि मध्य बिहारमधून ट्रफ लाइन गेल्यामुळे वादळ आणि पाऊस झाला आहे. राज्यात आता मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वेकडील प्रवाहामुळे वातावरणातील खालच्या पातळीवर आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली होती.