धक्कादायक ! 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार; दारू पाजून केले दुष्क्रूत्य

श्रीगोंदा :- तालुक्यात विसापूर जवळील गावात एका मागासवर्गीय तरुणीला मोटार सायकलवर घेऊन जाऊन, दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास एरंडोली गावचे शिवारात देवी मंदिराचे पाठीमागे जंगलाचे कडेला उघड्यावर वैभव जठार याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बियर पाजुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस स्टेशनला दिनांक 19 मे 2022 मे रोजी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे.पालघर जिल्ह्यातील रहिवाशी असलेली ही पीडित तरुणी लहानपणापासून आपल्या आजी सोबत तालुक्यातील एका गावात राहत आहे. मागील 2 वर्षापासून तरुणी वैभवला ओळखत आहे.दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4:00 वाजता वैभवने तरुणीला फोन करून गावाच्या बाजूला असलेल्या मज्जिद जवळ बोलावले.. घरच्यांना न सांगता तरुणी नमूद ठिकाणी गेली.. तेथून मोटरसायकलवर दोघे चिखली घाटातील महादेव मंदिराजवळ डोंगरावर गेले.
मंदिराच्या बाजूला झाडाच्या आडोशाला जाऊन गाडीच्या डिक्कीतून आणलेली बीअरची बाटली जबरदस्तीने पीडितेला त्याने पाजली. गोड गोड गप्पा मारून तुझ्या सोबत लग्न करतो म्हणत लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने त्या मध्यरात्री तरुणीसोबत दुष्कृत्य केले.यानंतर तिला गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला 2:00 वाजताच्या सुमारास एकटीला सोडून दिले व परत येतो म्हणाला. साधारण दीड तास तिने त्याची वाट पाहिली. मात्र, तो परत आला नाही. पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास गावाकडे जाणारा एक टेम्पो थांबला व त्याने विचारपूस करून नमूद पीडितेला तिच्या गावात आजीकडे पोचवले.
दुपारी आजी व आई यांना नमूद घटनेबाबत तिने सांगितल्यावर आजी, आईला मानसिक धक्का बसल्याने पीडित तरुणीने फिर्याद दाखल करण्यास विलंब केल्याचे नमूद केले आहे.घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने नमूद आरोपी विरोधात भादवि कलम 376 व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3(1)(A) व 3(2)(VA) प्रमाणे दिनांक 19 मे 2022 रोजी रात्री 10:58 वाजता पीडित 20 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.