धक्कादायक ! 15 वर्षाच्या मुलाचा 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

0 259

औरंगाबाद –    कोरोना (Corona) काळात शाळा (School)  बंद झाल्याने विद्यार्थीना (Students) ऑनलाईन (Online)  स्वरूपाचे शिक्षण देण्यात येत आहे. मात्र विद्यार्थी मोबाईल मध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नवा खाली काय करत आहे याकडे सर्वच पालकांनी लक्ष दिले पाहिजे. कारण जर पालकांनी आज लक्ष दिला नाही तर मुले मोबाइलचा गैरवापर देखील करू शकतात. (Shocking! 15-year-old boy abuses 5-year-old girl, accused arrested)

अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबाद मधून समोर आली आहे.  शहरातील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 5 वर्षांच्या मुलीला सायकल खेळवण्याचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सीसीटीव्हीमुळे  आरोपीला शोधणे सहज सोपे झाले. लाच्या वडिलांना हा प्रकार कळल्यानंतर हा प्रकार मोबाइलच्या अतिरेकी वापराने झाल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली.  एका अपार्टमेंटसमोर पाच वर्षांची लहान मुलगी सायकल खेळत होती. याच परिसरात राहणारा 15 वर्षीय मुलगा ( 15-year-old boy) शोधणे सहज सोपे झाले तेथून फिरत होता. या चिमुकलीला एकटीला पाहून त्याने सायकल खेळण्याच्या बहाण्याने गोड बोलून मुलीला सायकलवर बसवले. शेजारच्या कॉलनीत नेले. तेथे उभ्या असलेल्या दोन वाहनांच्यामध्ये नेत तिच्यासोबत अश्लील चाळे सुरु केले. मात्र समोरून एक महिला येत असल्याचे पाहताच त्याने पळ काढला. हा विचित्र प्रकार झाल्याची जाणीव झाल्याने चिमुकली प्रचंड घाबरली होती. कसा-बसा हा प्रकार तिने कुटुंबियांना सांगितला. वडिलांनी थेट पुंडलिक नगर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी याप्रकरणी रात्री सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादीचा भाजपाला दे धक्का ,भाजपचे २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts
1 of 1,487

15 वर्षाच्या मुलाने केलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर त्या मुलापर्यंत पोहोचायला पोलिसांना फार वेळ लागला नाही. दरम्यान मुलाच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी आधी आरोप टाळत प्रश्नांचा भडिमार सुरु केला. पण पोलिसांनी फुटेज दाखवताच त्यांनाही मोठा धक्का बसला. ते एकदम सुन्न झाले. कपाळाला हात लावला. काही वेळाने ते शांत झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरण, अत्याचार व बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाअंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Shocking! 15-year-old boy abuses 5-year-old girl, accused arrested)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: