DNA मराठी

धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार; गुन्हा दाखल

0 335
Shocking! Sexual abuse of a minor grandchild showing porn

प्रतिनिधी – DNA मराठी टीम

पुणे – मागच्या काही दिवसांपासून पुणे शहरात (Pune City) महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्हांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पुणे स्टेशन ते माल धक्का दरम्यान येणार्‍या सार्वजनिक शौचालयामध्ये १२ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन ते मालधक्का चौक दरम्यान येणार्‍या एक सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या आतमधील छोट्याशा जागेत, पीडित १२ वर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंबीय राहण्यास आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शौचास गेल्यावर तिच्या मागे एक व्यक्ती गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.

Related Posts
1 of 2,452

त्याच दरम्यान पीडित मुलीचा काका तिथे आल्यावर दरवाजा वाजविला. त्याच क्षणी आरोपी दरवाजा उघडून काकाला बाजूला ढकलून गेला आणि पीडित मुलीने काकाला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आमच्याकडे तक्रार येताच आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी त्याच भागातील असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: