धक्कादायक ! बापानंच केला 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

प्रतिनिधी – DNA मराठी टीम
पुणे – पुणे (Pune) शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हिंजवडी (Hinjewadi) परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांकडून (father) स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape) झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. तर तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यादोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दोन्ही आरोपी फरार आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सामन्यजनते मधून होत आहे. पुणे शहरात एका आठवडाभरात लैंगिक अत्याचाराच्या चार घटना घडल्या आहेत. अशा अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
अल्पवयीन मुलीवर शाळेत बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेत पीडित मुलगी शाळेमध्ये असताना एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर संबंधित व्यक्तीने त्या मुलीस या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला बघतो, अशी धमकी दिली.
मात्र घडल्य प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असुन, पीडित मुलीकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.