DNA मराठी

CSK च्या चाहत्यांना धक्का; धोनी ऐवजी ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

0 378
Shock to CSK fans; This player will lead the team instead of Dhoni

मुंबई –  आयपीएल (IPL 2022) सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला (CSK) मोठा धक्का लागला आहे. चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेत मागच्या १४ वर्षात पहिल्यांदाच आपला कर्णधार बदलला आहे.  महेंद्रसिंग धोनीने (M.S. Dhoni) चेन्नईचे कर्णधारपद सोडल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांना एक धक्का बसला आहे.

 

Related Posts
1 of 2,518

महेंद्रसिंग धोनी MS Dhoni नंतर चेन्नई सुपरकिंग्जने अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्याकडे चेन्नई संघाची धुरा सोपवली आहे. जडेजा हा संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आयपीएल सुरु होण्यासाठी फक्त दोनच दिवस शिलक्क असल्याने अचानक चेन्नई आणि धोनीने हा निर्णय घेतल्याने चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: