भारतीय मराठा महासंघाच्या तालुका कार्याध्यक्ष पदी शिवश्री धनंजय घोरपडे यांची निवड    

0 11

करमाळा  –   भारतीय मराठा महासंघाच्या करमाळा तालुका कार्यकरणी जाहिर करण्यात आली असुन करमाळा तालुका कार्याध्यक्ष पदी धनंजय घोरपडे यांची निवड भारतीय मराठा महासंघाचे करमाळा तालुका अध्यक्ष आनंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी बोलताना घोरपडे म्हणाले सध्याचा काळ समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा तसेच अडचणींचा आहे मराठा आरक्षण समाजातील तरुणांसाठी असणाऱ्या सारथी संस्था कामकाज ठप्प, युवकांना उद्योग क्षेत्रात कर्ज देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची समिती बरखास्त असे धक्के बसलेल्या स्थितीत समाजाने एकत्र येणे गरजेचे बनल्याचे प्रतिपादन भारतीय मराठा महासंघाचे नुतन तालुका कार्याध्यक्ष श्री धनंजय घोरपडे यांनी बोलले. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आनंद मोरे यांनी करमाळा तालुका संघटक पदी राजाभाऊ जगताप ,शहर प्रमुख किरण मोहिते, उपशहरप्रमुख नाना जाधव शहर कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, शहर सचिव विजय घोटणे, युवा शहर अध्यक्ष अविनाश पाबळे यांच्या निवडी करण्यात आल्या.

अशोक चव्हाण यांनी त्यांचा अभ्यास किती कच्चा आहे, हेच दाखवून दिले – प्रवीण दरेकर

Related Posts
1 of 1,290

यावेळी पुढे बोलताना मराठा समाजाला सामाजिक अडचणी सोबत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे पुर्वी एकरात शेती असणाऱ्या कुटुंबाकडे आता गुंठ्यांत जमीनी उरलेल्या आहेत.बेरोजगारी ,महागडे शिक्षण यामुळे बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.अशावेळी समाज बांधवांनी मुलांच्या जन्मकुंडलीपेक्षा कर्तुत्वाला महत्व द्यावे समाजातील सुसंवाद वाढविलेस अनेक प्रश्न सुटू शकतील असे शेवटी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या या मंत्र्याचे नाव चर्चेत मात्र … 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: