इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचा सायकल वरून निषेध मोर्चा

0 11

श्रीगोंदा –  केंद्र सरकारने जीवनावश्यक असणाऱ्या गॅस , पेट्रोल यांचे भाव सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर वाढविलेले असल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा शिवसेनेच्या वतीने सायकल रॅली काढून श्रीगोंदा तहसीलदार, पोलिस निरीक्षक याना निवेदन देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

  केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांचे गॅस, पेट्रोल यांची दरवाढ केल्याने आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे.केंद्र सरकारने मुद्दामहुन नागरिकांना त्रास देण्यासाठी दरवाढ केलेली आहे . त्यामुळे लागू केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी व सर्व सामान्य दिलासा द्यावा.
Related Posts
1 of 1,301
यासाठी श्रीगोंदा शिवसेनेच्या वतीने शहरातून सायकल रॅली काढून श्रीगोंदा अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले याना निवेदन देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. या निषेध रैलीला तालुक्यातील समता परिषदेने पाठिंबा दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दुतारे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गोरे,  तालुकाध्यक्ष संतोष खेतमाळीस, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजु गोरे,  शहराध्यक्ष हरिभाऊ काळे, सुरेश देशमुख मा . शहरप्रमुख शिवसेना नंदु ताडे, अनिल सुपेकर, संतोष शिंदे, जयराज गोरे उपस्थित होते.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: