2024 पर्यंत शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल – असदुद्दीन ओवेसी

0 210

सोलापूर –  मुस्लिम आरक्षणावरून (Muslim reservation) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AlMIM) चे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA)जोरदार टीका केली आहे. ते सोलापूर मध्ये बोलत होते. (Shiv Sena will go with BJP again by 2024 – Asaduddin Owaisi)

यावेळी ओवैसी यांनी शिवसेनासह काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यावर देखील टीका करत महाविकास आघाडीच्या धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर २०२४मधील शिवसेनेच्या भूमिकेविषयी देखील त्यांनी भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

2024 च्या निवडणुकांविषयी भाकित
राज्यात पुढील विधानसभा निवडणुका २ वर्षांनंतर अर्थात 2024मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये देखील महाविकासआघाडी एकत्र असणार का? याविषयी बरीच चर्चा आणि अंदाज सध्या सुरू आहेत. त्याविषयी आता ओवैसींनी भाकित वर्तवलं आहे. 2024 पर्यंत तुम्ही बघा, शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल असं ओवैसी म्हणाले आहेत.

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार?, नितीन गडकरी म्हणाले…

Related Posts
1 of 1,512

धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का?
असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारवर आणि आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. थ्री इन वन आहे की टू इन वन आहे काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांना? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना ओवैसींनी राहुल गांधींना उघड आव्हान दिलं आहे. “काँग्रेसला विचारा, त्यांचे माजी अध्यक्ष हिंदुत्वाविषयी फार बोलत असतात. महाराष्ट्रात काय होतंय त्याविषयी त्यांनी बोलावं. यावर बोलायची हिंमत आहे का राहुल गांधींची? सांगा एनसीपीवाल्यांना यावर बोलायला. आम्ही निवडणूक लढवायला लागलो तर म्हणता मतांची विभागणी करतोय. आम्ही मागणी केली तर जातीयवादी म्हणता. तुम्ही तर शिवसेनेला सत्ता दिली. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलंय. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देऊ शकता. तुम्ही काय ठेका घेतलाय का धर्मनिरपेक्षतेचा? असं देखील ओवैसी म्हणाले आहेत. (Shiv Sena will go with BJP again by 2024 – Asaduddin Owaisi)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: