शिवसेना शिवसंपर्क अभियान उद्धव ठाकरे यांच्या आदेशांने नगर तालुक्यात सुरू

0

अहमदनगर –   शिवसंपर्क अभियान (Shiv Sampark Abhiyan ) राज्यभर शिवसैनिक राबवित आहेत. या अभियानातून शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणवून घेणे, गावातील प्रश्नासंदर्भात चर्चा करणे यांसह संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे हा त्या मागचा हेतू असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना शिवसंपर्क अभियान पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशांने नगर तालुक्यात सुरू झाले आहे .टाकळी काझी , नागरदेवळे, भातोडी येथे आयोजीत अभियान कार्यक्रमात बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद संदेश कार्ले होते . या कार्यक्रमासाठी सभापती संदिप गुंड , उपसभापती डॉ. दिलीप पवार , प्रविण कोकाटे , तालुका प्रमुख राजेंद्र भगत , सरपंच शहाजी आटोळे, अविनाश पवार, जीवाजी लगड   उपास्थित  होते .

नगर तालुक्यातही पंचायत समिती गणनिहाय या संपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली.शिवसंपर्क अभियान नगर तालुक्यातील सहा जिल्हा परिषदेच्या सहा गटांत व पंचायत समितीच्या बारा गणातील एका गावात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहोत .तसेच शिवसैनिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक असे पक्षाच्या आदेशानुसार प्रयत्न करणार आहोत असे तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी सांगीतले.

काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम- शिवसेना

Related Posts
1 of 1,184

यावेळी  निसार शेख,अमोल कदम,माऊली धलपे,घनशाम राऊत,बंडु गायकवाड,अदीनाथ शिंदे राजुभाई शेख,योगेश लाडंगे,गणेश गुंड प्रसाद पवार,अजय बोरुडे,प्रकाश बोरुडे,संदीप खामकर,डाँ ससे,जिवाजि लगड,दत्ता जाधव,संतोष काळे,दत्तु हजारे, रवी म्हस्के,पोपट निमसे, सुशील कदम,संतोष धाडगे निखील शेलार,योगेश धाडगे,रवि धाडगे,मा सरपंच खरपुढे प्रकाश कुलट आदि शिवसैनिक उपस्थित होते.

आधी मुलांची गळा दाबून हत्या नंतर गळफास घेत महिलेनं संपवला आपला जीव

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: