
शनिवारी काँग्रेसच्या पुढाकाराने केंद्र सरकारला लिहिण्यात आलेल्या या पत्रावर तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय (एम), पीसीआय, डीएमके, आरजेडी, जेकेएनसी आणि इतर पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पंतप्रधान मोदी या हिंचासाराच्या पार्श्वभूमीवर मौन बाळगून असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आलीय. “पंतप्रधानांचं मौन पाहून आम्हाला धक्का बसलाय. आपल्या वक्तव्यांनी आणि वागण्याने समाजातील काही घटकांना उकसवण्याचं काम करणाऱ्यांविरोधात पंतप्रधान काही बोलत नाही किंवा कारवाई करत नाही हे धक्कादायक आहे. हे मौन म्हणजे अशाप्रकारच्या खासगी झुंडींना एकप्रकारे देण्यात आलेलं समर्थन आहे,” असं पत्रात म्हटलंय.
“देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये एक विशिष्ट पद्धत दिसून येत असल्याचं निदर्शनास आल्याने आम्हाला चिंता वाटतेय. द्वेषपूर्ण भाषणांमुळे सशस्त्र धार्मिक मिरवणूका निघतात आणि त्यामधून हिंसा होत आहे,” असं निरिक्षण विरोधी पक्षांनी या पत्रातून नोंदवलंय.
“आम्ही लोकांना विनंती करतोय ही समाजामध्ये दूही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून दूर रहावे. आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व केंद्रांना आणि कार्यकर्त्यांना शांतता आणि एकता कायम ठेवण्यासाठी काम करण्याचं आवाहन करतोय,” असं या पत्रात म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेनं मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. दिवसोंदिवस हा विषय वाढत जाणार त्याप्रमाणे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला धक्का बसणार असल्याची भीती नेतृत्वाला वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.(Shiv Sena pushes Congress, NCP: Many discussions erupt; Know the case(