DNA मराठी

अहमदनगर येथे किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेनेची निदर्शनं

0 92
Shiv Sena protests against Kirit Somaiya in Ahmednagar

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

अहमदनगर –  अहमदनगर (Ahmednagar) येथे शिवसेनेच्या (Shivsena) वतीने भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा निषेध करण्यात आला आहे. शिवसेनेच्यावतीने माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.(Shiv Sena protests against Kirit Somaiya in Ahmednagar)

Related Posts
1 of 2,487

आयएनएस विक्रांत (INS Vikrant) जो देशाचा एक ठेवा आहे त्याच्या नावावर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून पैसे जमा केले. हा एक प्रकारे राष्ट्रद्रोहच आहे असं आंदोलकांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली. सोबतच भाजपने सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी असं मत शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी मांडले. (Shiv Sena protests against Kirit Somaiya in Ahmednagar)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: