राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनाने तयार केला ‘हा’ मास्टर प्लॅन; शिवसैनिकांची असणार करडी नजर

0 170
Rajya Sabha elections: Shiv Sena discusses 'that' names

 

मुंबई – येत्या दहा जूनला देशातील विविध राज्यात राज्यसभासाठी निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडणार आहे. महाराष्ट्र मध्ये देखील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे.

राज्यातील सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा (BJP and Shiv Sena) उमेदवार रिंगणात आहे. त्यामूळे दोन्हीं पक्षांकडून खलबतं सूरु झाली आहे.
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. मात्र त्या भेटीत ऑफर फिस्कटली. दोन्हीकडे एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच शिवसेनेनं खास रणनिती आखली आहे.

हॉटेल बुक

Related Posts
1 of 2,139

महाविकास आघाडीनं मतं फुटू नये यासाठी सावध पाऊल उचललं आहे. त्यासाठी आमदारांकरिता हॉटेल बूक केलं आहे. हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकांची नजर असणार आहे. शिवसेनेने देखील सर्व आमदारांना बॅग भरून वर्षावर बैठकीला येण्याचं सांगितलं आहे. वर्षावर मुख्यमंत्री सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

त्यात आज दिवसभर बैठकींचा सिलसिला सुरु असणार आहे. दुपारी मंत्रिमंडळाची कोरोना संदर्भात बैठक आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्र्यांसोबत राज्यसभेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी बैठक घेतील आणि त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री राज्यातील अन्य अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार आहे. यानंतर त्यांची रवानगी हॉटेलवर होणार आहे.

 

सर्व आमदारांना सुरक्षित ठेवणार असून त्यांची सर्व काळजी घेतली जाईल, असं सेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या विविध टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: