शिवसेना काँग्रेसशी कधीही कट्टरविरोधी नव्हती- खासदार शरद पवार

0 1,312

 मुंबई –    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस (Congress) बरोबर मतभेद असले तरी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि पंडित नेहरू (Pandit Nehru) यांच्या विचारधारेशी राष्ट्रवादी काँग्रेस बांधील आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शिवसेने (Shiv Sena) शी हातमिळवणी करण्याचा अंतिम निर्णय सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी घेतला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी ते लहान असल्यापासून पाहात आहे. शिवसेनेचा कारभार पाहायला त्यांनी सुरूवात केली त्या वेळी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार चालत होते पण जेव्हा त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी येऊन पडली त्या वेळी त्यांच्या क्षमतांबद्दल बोलले गेले. मुंबई महापालिकेत जेव्हा शिवसेनेने विजय मिळवला त्या वेळी उद्धव ठाकरे हे मृदूभाषी असले तरी त्यांच्यात क्षमता आहे, हे स्पष्ट झाले.

हे पण पहा – महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

Related Posts
1 of 1,635

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेना वाढली. शिवसेना काँग्रेसशी कधीही कट्टरविरोधी नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आणीबाणीनंतरही निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसविरुद्ध उमेदवार दिला नव्हता. २०१९मध्ये जेव्हा भाजप व शिवसेना यांच्यात मतभेद झाले त्या वेळी आम्हाला शिवसेनेशी बोलण्याची गरज असल्याचे वाटले. संजय राऊत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सोनिया गांधी यांनी अन्य नेत्यांशी बोलून अंतिम निर्णय घेतला. राहुल गांधी या निर्णयात सहभागी नव्हते. सोनिया गांधी यांनीच अंतिम निर्णय घेतला.

प्रेमात धोका मिळाल्यानं साखरपुड्याच्या दिवशी प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: