विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतून ‘या’ नावांची चर्चा

0 2,225
नवी मुंबई –   नुकतेच निवडणूक आयोगाने सहा विधानपरिषदच्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  त्यानंतर प्रत्येक पक्षातून इच्छुकांचे नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई मतदारसंघाच्या जागेवर शिवसेने (Shiv Sena) तून वरळीचे माजी आमदार (MLA Sunil Shinde) सुनील शिंदे, शिवसेना उपनेते आणि माजी राज्यमंत्री ( Sachin Ahir) सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण ( Varun Sardesai) सरदेसाई, विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. (Shiv Sena discusses ‘this’ names for Legislative Council elections)
सध्या शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्या नावाचीही चर्चा आहे. वरुण सरदेसाई सध्या युवासेनेचे सरचिटणीस आहेत. दरम्यान 2024 मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच सध्याच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावावर जोर दिला जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Related Posts
1 of 1,518

माजी आमदार सुनील शिंदे यांनी 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपली जागा रिक्त केली. त्यामुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यातच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश करणारे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं नाव देखील चर्चेत आहे. (Shiv Sena discusses ‘this’ names for Legislative Council elections)

 हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: