अमेरिकेत पाहिल्यांदा सातासमुद्रपार शिवजयंती उत्साहात….
"जय जय महाराष्ट्र माझा" या महाराष्ट्राच्या अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. "

अमेरिका : महाराष्ट्र माझा, ऑस्टिन या स्वयंसेवी संस्थेने या वर्षी अमेरिकेत पाहिल्यांदा टेक्सास राज्याची राजधानी, ऑस्टिन येथील स्टेट कॅपिटॉल बिल्डिंगच्या प्रागंणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पर्यटन विकासासाठी साडे तीन कोटी मंजूर – आ.बाळासाहेब थोरात
“जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्राच्या अभिमान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. “अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांनी” सादर केलेल्या “शिवजन्म ते राज्याभिषेक सोहळा” या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.
कॅपिटॉल बिल्डिंगच्या “द ग्रेट वॉक” वरून ढोल ताशां लेझीमच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाचे शिखर गाठले गेले. पारंपरिक पद्धतीने “शंख वाजवून व गारद” म्हणून मिरवणुकीची सुरुवात झाली. शिवरायांचा “भगवा पालखीसमोर” दिमाखात फडकवला जात होता.
मिरवणुकीची सांगता महाराष्ट्र माझाच्या कलाकारांनी सादर केलेल्या “ढोल ताशा लेझीम व झांज” यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली. “प्रेक्षकांनी यावेळी शिवरायांना अभिवादन” केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले साईबाबा समाधी दर्शन
अमेरिका व टेक्सास राज्याच्या झेंड्याबरोबर “छत्रपतीं शिवरायांचा भगवा” फडकावण्यात आला. सातासमुद्र पार शिवजयंती साजरी होत असल्याने याकार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.