हिंगणगाव येथे शिवजयंती विविध किल्ले बनवून साजरी

0 12

अहमदनगर –  अहमदनगर तालुक्यातील हिंगणगाव येथे गेल्या 13 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम घेऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येते. सालाबाद प्रमाणे या ही वर्षी अतिशय उत्साहात शिवजयंती कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त घरोघर किल्ले बनवा ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात स्वराज्य मित्र मंडळ, हिंगणगाव,कृष्णा कांडेकर,प्रथमेश दरंदले,मयूर कांडेकर,ओमकार कांडेकर या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे किल्ले बनवले त्यांना सुनील कांडेकर उद्योजक यांच्यातर्फे रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तसेच गावामध्ये तरुण मुलांचा अभ्यासाचा कल वाढण्यासाठी ग्रंथालय निर्मिती चळवळ ह्या शिवजयंती पासून राबवण्यात येणार असून त्यासाठी गावातील सुधीर सोनवणे व शक्ती सोनवणे यांनी पुस्तके देऊन सुरुवात केली आहे.वर्षभर गावात हि चळवळ सुरू राहणार अशी माहिती मुकुंद दुबे व सोमनाथ झावरे यांनी दिली.

वाळूमध्ये सर्वांचेच हात बरबटलेले प्रत्येकाचे दर सोशल मीडियावरती जाहीर

गावामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे व भारत मातेची सेवा बजावत असणारे मेजर योगेश बोबडे व शुभम झावरे यांचा सत्कार करण्यात आला.

Related Posts
1 of 1,291

त्यामुळे संजय राठोड प्रकरणावर उद्धव ठाकरे शरद पवारंच ऐकतील – नारायण राणे 

सरपंच आबापाटील सोनवणे मार्गदर्शन करताना सांगितले की,आपल्या सामाजिक कार्यात आम्ही नेहमी मदत करू तसेच ग्रामपंचायतची एक खोली मुलांच्या ग्रंथालयासाठी देऊ असे आश्वासन दिले.तसेच ह्या कार्यक्रमासाठी हिंगणगाव सरपंच आबापाटील सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य वैभव ताकपेरे,एकनाथ झावरे,बबन झावरे,निसार पठाण,अनिल सोनवणे,संभाजी कोल्हे,अर्जुन पादिर गुरुजी,ज्ञानदेव वाघमारे,आदिनाथ बोबडे,देविदास ढगे,ऋषिकेश सोनवणे,संतोष दरंदले,ओंकार झावरे, सुदर्शन राजगुरू तसेच गावातील तरुण वर्ग उपस्थित होता.ओंकार झावरे शिवव्याख्याता याने शिवगर्जना अतिशय जोशात केली ढोल ताश्याच्या गजरात शिवजयंती उत्सवात साजरी झाली.

शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी अशी दिली आपली प्रतिक्रिया…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: